मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

ठाकरे सेनेच्या पाचल विभागप्रमुख पदी विलास नारकर यांची नियुक्ती

राजापूर : तालुका ठाकरे शिवसेना पक्षाच्या पाचल विभागप्रमुख पदी करक गावचे माजी सरपंच विलास विठोबा नारकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांनी विलास नारकर यांना पाठविले आहे.

राजापूर तालुक्यातील पाचल विभाग हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विभाग मानला जातो. संपूर्ण राजापूर तालुकाच नव्हे तर या विधानसभा मतदारसंघांचे राजकीय केंद्र म्हणून तालुक्याच्या पूर्व परिसराकडे पाहिले जाते. अशा या महत्त्वपूर्ण विभागाची मोठीं जबाबदारी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विलास नारकर यांच्याकडे देण्यात आली असून विभागात शिवसेना ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

सोमवारी शिवसेना ठाकरे पक्षाच्या तालुका मध्यमध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विलास नारकर यांचा देखील समावेश होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख कमलाकर कदम, माजी जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग उपळकर, संजय पवार, संतोष हातणकर, अनंत कोलते, अशोक सक्रे, नाना गोटम यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!