पर्यटनमुख्य बातमीराजकारण

रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावरील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे ९ एप्रिल रोजी उद्घाटन

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती : इको टॉयलेट व चेंजिंग रूमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर

मुंबई : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेतंर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे ९ युनिट आणि चेजिंग रुमच्या एकूण ९ युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच मांडवी किनाऱ्यावर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वखर्चाकून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिट बांधण्यात येत असून या युनिटचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते ९ एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे.

कोकणातील विकास कामांची गती वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटची मागणी भाजपाच्या महिला मोर्च्याच्या दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्ये बीच (रत्नागिरी), गणपतीपुळे बीच (रत्नागिरी) गणेशगुळे बीच (रत्नागिरी), वळणेश्वर बीच (ता. गुहागर), लाडघर बीच (ता. दापोली) व मुरुड बीच (ता. दापोली) या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेजिंग रुम युनिट बांधण्यात येणार आहे. तसेच मांडवी बीच येथे बांधण्यात येणारे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिट हे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चाने बांधण्यात येत आहे.

या युनिटचे उद्घाटन ९ एप्रिल होणार आहे. तसेच अन्य ६ ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेजिंग रुमच्या एकूण १३ युनिटसाठी चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. या ९ युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या युनिटच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचेही सहकार्य लाभले.

कोकणाच्या समुद्रकिनारी पर्यटनासाठी दरदिवशी हजारो आबालवृध्द पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात; परंतु या पर्यटकांसाठी किनाऱ्यावर जवळपास शौचालय वा चेंजिग रूमची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची गैरसोय व्हायची. कोकणातील विकास कामांची गती वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटची बांधण्याची मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. चव्हाण यांनी यांसदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे प्रयत्न केल्यानंतर मंत्री गोरे यांनी तात्काळ रत्नागिरी समुद्रकिनारच्या ६ ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेंजिग रुमच्या १३ युनिटसाठी मंजुरी दिली व ५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्ये बीच (रत्नागिरी), गणपतीपुळे बीच (रत्नागिरी), गणेशगुळे बीच (रत्नागिरी), वळणेश्वर बीच (ता. गुहागर), लाडघर बीच (ता. दापोली) व मुरुड बीच (ता. दापोली) या ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेजिंग रुम युनिटच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे.

सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट आणि कंसात चेंजिंग रुमची संख्या)  

भाट्ये बीच (२ युनिट, २ युनिट), गणपतीपुळे बीच (२ युनिट, २ युनिट), गणेशगुळे बीच (१ युनिट,१ युनिट), वेळणेश्वर बीच (१ युनिट, १ युनिट), लाडघर बीच (१ युनिट, १ युनिट), मुरुड बीच (२ युनिट, २ युनिट). एकूण रक्कम ५ कोटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!