मुख्य बातमी

नॅशनल मेडिकल्सच्या तिसऱ्या शाखेचा उद्या भव्य शुभारंभ

रत्नागिरी : शहरामध्ये नॅशनल मेडिकल्सच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. ही शाखा भैरवनाथ कृपा बिल्डिंग, गोडबोले स्टॉप, मजगाव रोड, मारुती मंदिर येथे रत्नागिरीकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला रत्नागिरीतील प्रथितयश डॉ. रमेश चव्हाण आणि प्रसिद्ध उद्योजक रवींद्र (अण्णा) सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

बसस्थानकासमोरील नॅशनल मेडिकल्स गेली अनेक वर्षे रत्नागिरीकांच्या सेवेत असून, काही वर्षांपूर्वी आरोग्य मंदिर येथे याची दुसरी शाखा सुरू झाली होती. आता मजगाव रोडवरील गोडबोले स्टॉप येथे भैरवनाथ कृपा बिल्डिंगमध्ये तिसरी शाखा सुरू होणार आहे.

या सोहळ्याला रत्नागिरीकरांनी, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!