शारदोत्सवाच्या निमित्ताने कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित तालुक्यातील श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शाळेतील महिला कर्मचारी सौ. सुर्वे, श्रीमती मोहिते, सौ. पेडणेकर, सौ. कामतेकर, सौ. शितूत त्याचप्रमाणे शाळेतील सेविका श्रीमती खांडके, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला सौ. शितप, सौ. भागाडे, सौ. भारती यांचा देखील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, कार्यकारणी सदस्य शंकर कोळंबेकर, प्रकाश ठोंबरे, जांभरुण गावचे सरपंच गौतम सावंत, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


शाळेच्या इतिहासातील शारदोसवाच्या निमित्ताने शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा होणारा सन्मान ही पहिलीच गोष्ट असल्याने महिला वर्गांमध्ये विशेष समाधान आहे. महिलेचा सन्मान हा त्यांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा पायंडा कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने पाडण्यात आला. त्याचे विशेष कौतुक कोतवडे पंचक्रोशीमधून होत आहे. संस्थेचे मान्यवर पदाधिकारी संजय मयेकर यांनी या निमित्ताने महिला कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.



