क्रीडामुख्य बातमी

सीबीएससी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या दुर्वा पाटीलची निवड

रत्नागिरी : शहराजवळील कारवांचीवाडी येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी व युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरमध्ये तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणारी दुर्वा संदीप पाटील हिने विभागीय सीबीएससी तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केले आहे.

ही स्पर्धा ५ ते ९ ऑगस्ट या कालावधीत पुणे येथे विभागीय सीबीएससी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत दुर्वा हिने सुवर्णपदक पटकावल्याने पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ता गायकवाड, युवा तायक्वांदोचे अध्यक्ष राम कररा, शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सुधीर, श्रीमती सपना यांनी अभिनंदन केले. तसेच सुवर्णपदक संपादन केल्याने दुर्वा हिची निवड उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीबीएससी स्पर्धेसाठी करण्यात आली असून दिनांक २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धा पार होणार आहेत.

दुर्वाचे प्रशिक्षक म्हणून सौ. शशीरेखा कररा काम पाहणार आहेत. यश संपादित केल्याने सर्व स्तरावरून दूर्वा व त्यांचे प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!