
रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात काल रविवारी सायंकाळी झालेल्या एका अपघातात ५८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे ही महिला खाली पडली आणि तेच अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेले. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली.


