मुख्य बातमी

कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेमध्ये १० व ११ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, पंढरीनाथ (पॅडी) कांबळे, प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, गायिका ईशानी पाटणकर, शाहीर निशांत शेख यांची उपस्थिती

रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे उद्यापासून तीन दिवस भरविण्यात येणाऱ्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेमध्ये १० व ११ मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे.

उद्या (१० मे) रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, पॅडी कांबळे यांच्या विनोदी अभियानाची धमाल सोबत महाराष्ट्राचा प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, “सूर नवा ध्यास नवा”मधील गायिका ईशानी पाटणकर आणि लोकशाहीर अमर शेख यांचे नातू शाहीर निशांत शेख आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राची परंपरा असलेली लोकगीते, भक्तिगीते, पोवाडे, लावणी, कोळीगीते यांचा गीत संगीत आणि नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे.

रविवार (११ मे) महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक रोहीत राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांच्यासोबत संपूर्ण वाद्यवृंद लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील या सर्व नामवंत कलाकारांसोबत रत्नागिरीतील स्थानिक कलाकार सुद्धा आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.

हे दोन्ही कार्यक्रम रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सर्व रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!