मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

खेड : खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज (१४ ऑक्टोबर) भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री. खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ, असा विश्वास श्री . खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माजी आ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की , “विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे  वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे.” त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला कोकणात बळ मिळणार असल्याचा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन. जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुबोध जाधव, संतोष नलावडे, सुरेश सावंत, विलास जाधव, मनिष खवळे,  मिलिंद नांदगांवकर, संजय आखाडे, रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!