नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी हेगशेट्ये महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये प्रथम प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड (स्टेट बोर्ड) आणि सीबीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवनिर्माण हा एक उत्तम पर्याय आहे. एकदा प्रवेश घेतला की, पुढील सर्वं आणि योग्य शिक्षण “नवनिर्माण”च्या एकाच छताखाली उपलब्ध आहे. नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखा उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेत आयटी हा विकल्प उपलब्ध आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेत कम्प्युटर सायन्स, आयटी त्याचबरोबर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि मेकॅनिकल मेंटेनन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आता सावित्रीची लेक घरी बसणार नाही त्यासाठी नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी कला शाखेमध्ये मुलींसाठी मोफत प्रवेश योजना सुरू केली आहे.
त्याचप्रमाणे एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयमध्ये मुंबई विद्यापीठाचे बीए, बीकॉम, बीएमएस, बीबीआय, बीएससी कॉम्प्युटर, बीएससी आयटी, बीएससी हॉस्पिटलिटी स्टडीज आणि आरोग्य विद्यापीठाचे फिजिओथेरपी यांसारखे विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आणि डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत. कोकण आणि परिसरातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आणि त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शासकीय त्याचबरोबर महाविद्यालयाच्या स्वतंत्र शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थी दत्तक योजना” त्याचबरोबर “कमवा आणि शिका” याही योजना महाविद्यालयात सुरू आहेत. अद्ययावत प्रयोगशाळा, तज्ञ मार्गदर्शक, खेळासाठी इंडोर आणि आऊट डोअर मैदान उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9423189761/ 9421186260


