मुख्य बातमीराजकारण

क्रांतीनगरमधून (रत्नागिरी) सौ. सरिता जितेंद्र कदम यांना वाढता पाठिंबा

पाठिंबा दर्शविण्यासाठी नागरिकांनी केले सभेचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ५ क्रांतीनगर परिसरातील नागरिकांनी बैठक बोलवत प्रभाग क्रमांक ५ मधून सौ. सरिता जितेंद्र उर्फ दादा कदम यांच्या निवडणुकीसाठी एकमुखी पाठिंबा दर्शविला.

आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नगर पालिकेच्या आरक्षणामुळे अनेकांची स्वप्न धुळीस मिळाली असून, अनेकांनी उमेदवारी मिळण्यासाठी कंबर कसली आहे.

शहरातील क्रांतीनगर हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक असलेल्या सौ. सरिता कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवार हा स्थानिकच असला पाहिजे, असे म्हणत ठेवत क्रांतीनगर परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत १३ ऑक्टोबर रोजी एका सभेचे आयोजन केले होते. यात उपस्थित सर्व नागरिकांनी सौ. सरिता कदम यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!