मुख्य बातमी

रत्नागिरीत श्री गजानन महाराज मंदिरातर्फे महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरातर्फे महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ४ वाजता श्री गजानन महाराज मंदिरात ही कीर्तनं होणार आहेत.

३० ऑक्टोबर रोजी मानसी जोशी : आदिशक्तीची भक्ती, ३१ ऑक्टोबर रोजी सौ. सुखदा मुळ्ये-घाणेकर : नेत्रकमल, १ नोव्हेंबर रोजी सौ. प्रज्ञा देशपांडे : हनुमान सेवा, २ नोव्हेंबर रोजी सौ. वरदा लिंबेकर – चाकुरकर : रुक्मिणी स्वयंवर, ३ नोव्हेंबर रोजी सौ. वेदश्री ओक – चंडिका अवतार, ४ नोव्हेंबर रोजी सौ. श्रध्दा भाटे – भीष्म प्रतिज्ञा, ५ नोव्हेंबर सौ. अवनी गद्रे – हळदीकुंकू अशी सात कीर्तने होणार आहेत.

या सर्व कीर्तनांना प्रसाद वैद्य तबला तर चैतन्य पटवर्धन संवादिनी साथ करणार आहेत. या सर्व कीर्तनांचा आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!