मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी संजय जाधव यांची निवड

आबलोली (संदेश कदम) : चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा करंबवणेचे माजी अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ उपाध्यक्ष, करंबवणे गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच संजय जाधव यांची चिपळूण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीवर निवड करण्यात आली आहे.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसघाचे आमदार शेखर निकम यांनी शिफारस करून श्री. जाधव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संजय जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!