मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
सुरळ बोऱ्या फाटा येथे २६ रोजी राजश्री जनसेवा मेडिकलचे उद्घाटन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात सुरळ बोऱ्या फाटा येथील राजश्री जनसेवा मेडिकलचे (केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट) उद्घाटन उद्या (२६ ऑक्टोबर) सकाळी ९.३० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदरजी यांची कृपा आणि ब्रम्हनिष्ठ संताच्या आशिर्वादाने आग्रे कुटुंबीय नवीन व्यवसायमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना औषधांसाठी शहरी भागात जाण्यासाठीची वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सीताराम पांडुरंग आग्रे, रवींद्र पांडुरंग आग्रे, दिनेश पांडुरंग आग्रे व आग्रे कुटुंबीय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



