मंगेश जाधव राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र मंगेश राजाराम जाधव यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत “दिशा महाराष्ट्राची” यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तुषार गौतम नेवरेकर आणि रोहिणी दीक्षित (कर्नाटक) यांच्या हस्ते त्यांना सन्मानित आले.
मंगेश जाधव गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. कोकणातील ग्रामीण भागातील अनेक मूलभूत स्थानिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रूटी अत्यंत परखडपणे नि:पक्षपातीपणे समोर आणल्या आहेत. सध्या ते विविध समाज माध्यमात यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. या पूर्वीही त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय प्रतिभारत्न पुरस्कार अखिल भारतीय पत्रकार संघ मुंबई यांचा राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार प्राप्त झाला आहे.

याच सन्मान सोहळ्यात “दिशा महाराष्ट्राची”साठी प्रतिनिधी म्हणून मंगेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आदर्श प्राचार्य, सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहीते यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र आणि ओळख पत्र देऊन देण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा (नवी मुंबई) येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत जगताप, इक्बाल मुकादम, भाऊ कांबळे, माला मेश्राम, डॉ. रोहिणी दीक्षित, कवी सरकार इंगळी, सुवर्णा कदम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सपना नेवरेकर व चंद्रसेन जाधव यांनी केले.



