मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेच्या साहित्यासाठी आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे यजमान पद भूषवण्याचा बहुमान नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत हा अभिमानाचा आणि गौरवशाली क्षण आहे. हे संमेलन २२ नोव्हेंबर रोजी एस. एम. जोशी विद्यानिकेतन, एमआयडीसी, रत्नागिरी येथे होणार आहे. त्यानिमित्ताने अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची मांदियाळी रत्नागिरीमध्ये असणार आहे. हा साहित्य सोहळा अत्यंत उत्साहात, नवोदित तरुणाईच्या सहकार्याने नवसंकल्पनांचा साहित्य जागर घडवतील असा विश्वास आहे.

या निमित्ताने एक विशेष स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून साहित्यिक, कवी, लेखक, विद्यार्थी यांच्यासोबतच साहित्याची आवड असलेल्यांसाठी या स्मरणिकेत साहित्य पाठवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिकांकडून कथा, कविता, ललित व विविध लेख मागविण्यात येत आहेत. आपले रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्य चळवळीत अपूर्व योगदान आहे. तरी आपण ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे साहित्य अप्रकाशित असावे. आपले साहित्य rtnssamelan@gmail.com या ई मेलवर पाठवावे. साहित्य हे युनिकोड फाँटमध्ये असावे. शब्दमर्यादा १००० ते १२०० पर्यंत असावी. आपल्या लेखनाच्या शेवटी आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेल नमूद करावा. आपले साहित्य निवडण्याचा अधिकार फक्त संपादक मंडळाकडे राहिल. साहित्यातील मतांसाठी पूर्ण जबाबदारी लेखकांची असेल. आपल्या साहित्याशी संबंधित असलेले फोटो किंवा रेखाचित्र असल्यास पाठवावे. अधिक माहितीसाठी प्रा. प्रकाश पालांडे (९४२०८४२७९९), प्रा. सचिन टेकाळे (९५१८५९५७९९), प्रा. अश्विनी कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!