मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
नाटक कंपनी चिपळूणतर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा

चिपळूण : नाटक कंपनी चिपळूणच्या वतीने मराठी रंगभूमी दिन (५ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना रंगभूमी दिनानिमित्त मिठाई देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या विजयाचा आनंदही व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी नगर पालिकेचे अधिकारी मंगेश पेढांबकर यांचा सन्मान करून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील मोहिते, किंजलकर अधिकारी व कर्मचारी वर्गाला मिठाई वाटून रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमात नाटक कंपनी चिपळूणचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे, सचिव तुषार जाधव, माजी अध्यक्ष श्रवण चव्हाण, तसेच प्रद्युम्न देवधर आदी उपस्थित होते.


