मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कै. डॉ. नानासाहेब मयेकर विद्यालय काजुर्ली येथे शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

आबलोली : मालगुंड एज्युकेशन सोसायटी संचालित कै. डॉ. नानासाहेब मयेकर विद्यालय काजुर्ली (ता. गुहागर) येथील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधून येऊन प्रा. उमेश अपराध व मित्र परिवार हे शैक्षणिक साहित्य वाटप करतात.

ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे हाच तर जीवनातील खरा आनंद आणि जीवनाचा खरा अर्थ आहे. कर्तबगार मुलांच्या पाठिवरती जेव्हा शाबासकीची थाप पडते तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. प्रेम, प्रेरणा, प्रोत्साहन व आपुलकी अशी एक गोष्ट आहे, की ती आयुष्यभरासाठी पुरते. याच भावनेतून आम्ही हे कार्य करीत असल्याची भावना प्रा. उमेश अपराध यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर, सचिव विनायक राऊत, सह सचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक रोहित मयेकर व परेश हळदणकर, सल्लागार उमेश अपराध व नंदकुमार डिंगणकर, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी (कोल्हापूर), डॉ. उज्वल मुजुमदार, डॉ. रविंद्र पोर्लेकर, सुनील बेळेकर, काजुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष घाग, जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे, माजी मुख्याध्यापक प्रकाश वंजोळे व हनुमंत कदम, काजुर्लीच्या पोलीस पाटील सौ. सीमा लिंगायत, सरपंच सौ. मेघना मोहिते, कोसबीच्या माजी उपसरपंच मुलू सुवरे, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष कैलास साळवी, सदस्य चंद्रकांत खानविलकर, काजुर्ली विद्यालय शिक्षक वृंद श्रीमती परविना तडवी, सौ. वैष्णवी पावरी तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी महाडिक यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. वर्षा पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!