मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोलीत मुंडेकर विमा कार्यालयाचे उद्घाटन 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली पंचक्रोशी मधील गोरगरीब जनतेला मुंडेकर विमा सेवा कार्यालयाचा लाभ मिळावा आणि मुंडेकर विमा सेवा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठीच मुंडेकर विमा सेवा नावाने एलआयसीच्या सर्व सेवा एकाच छता खाली उपलब्ध झाल्या आहेत. नुकतेच या कार्यालयाचे आबलोली येथे उद्घाटन झाले.

भातगाव (ता. गुहागर) गावातील युवक धीरज भागा मुंडेकर या तरुणाने भातगाव येथे या व्यवसायाची मुहूर्तमेढ अनेक वर्षांपूर्वी रोवली होती. उत्तम व्यवसाय आणि विश्वास याच्या जोरावर गुहागर तालुक्यातील अनेक गावात तो एलआयसीची सेवा देत आहे. या व्यवसायात काम करत असताना धीरज मुंडेकर याने एलआयसीचा जागतिक स्तरावरील एमडीआरटी हा किताब सलग तीन वर्ष पटकावला आहे. याचे सर्व श्रेय तो आपल्या विमाधारकांना देत आहे.

गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठ येथे नुकतेच त्याने आपल्या आई-वडिलांच्या हस्ते मुंडेकर विमा सेवा कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात केले. या वेळी आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, आबलोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन बाईत यांच्यासह विमाधारक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!