मुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलमध्ये नवीन रंगमंचाचे उद्घाटन 

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये नवीन रंगमंचाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक यदुनाथ राजाराम तथा बापू बेर्डे (मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहकार्यवाह राजेंद्र फणसोपकर, खजिनदार सत्यवान तळेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, सदस्य प्रकाश ठोंबरे, अनंत पालये, राजेंद्र कोसले, शंकर कोळंबेकर, रोशन कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

उद्घाटक श्री. बेर्डे यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या रंगमंचासाठी आवश्यक असलेला सर्वनिधी उपलब्ध केला आणि आपल्या मुलाची आठवण म्हणून कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने या रंगमंचाची निर्मिती करण्यात आली. यापुढे हा रंगमंच दिवंगत अनुराज यदुनाथ बेर्डे या नावाने ओळखला जाईल अशा प्रकारची घोषणा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

उद्घाटनाच्या निमित्ताने श्री. बेर्डे यांनी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. आधुनिक युगामध्ये आवश्यक असलेली सर्व शैक्षणिक कौशल्य या शाळेमध्ये देण्यात यावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्न होण्याच्या सर्व गोष्टींचा संस्थेने आग्रही क्रमाने विचार करावा अशा प्रकारची सूचना दिली. संस्थेची जाहीर आभार मानून आपल्या मुलाचे नाव अजरामर केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!