रविवारीही उमेदवारांना ऑनलाईन, ऑफलाईन नामनिर्देशन पत्र सादर करता येणार

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये (तीनही दिवस म्हणजेच रविवार, १६ नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पद्धतीनेही आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील” असे आदेशित केले असल्याची माहिती जिल्हा सह आयुक्त नपाप्र वैभव गारवे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्र- रानिआ/निका/नप- २०२५ / प्र.क्र.१४ / का. ६, दि १४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशाअन्वये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगरपालिका व लांजा, देवरुख आणि गुहागर या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांना १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये (तीनही दिवस, रविवार, १६ नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील यांची नोद घ्यावी. या वेळापत्रकानुसार नामनिर्देशन प्रक्रिया नियमितपणे सुरू राहील, असे श्री. गारवे यांनी सांगितले.



