मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
दापोली येथे बळीराज सेनेतर्फे लोकनेते शामराव पेजे यांना अभिवादन

आबलोली (संदेश कदम) : दापोली येथे समाज कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत सुरुवातीलाच १९९२ सालचे दापोलीचे पहिले आमदार आणि कुणबी समाजाचे नेते स्वर्गीय शामराव पेजे यांना त्यांच्या स्मृति दिनी अभिवादन करुन दोन मिनिटे स्तब्ध ऊभे राहून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, तालुका संपर्क प्रमुख मनोहर पवार, सुर्यकांत पागडे, ग्रामीणचे अध्यक्ष रमेश पांगत, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भूवड यांच्यासह बळीराज सेना व कुणबी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



