मुख्य बातमी

दापोलीत ३० सप्टेंबर रोजी महसूल लोकअदालत

रत्नागिरी : सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार कार्यालयाच्या स्तरावर दाखल झालेली ७० ब कुळाची दावा प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकअदालत मोहिमेच्या धर्तीवर “महसूल लोकअदालत” ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दापोली तहसीलदार कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी आपसातील तडजोडीनुसार किंवा स्वसंमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी दाव्यातील सर्व पक्षकार यांनी स्वतः किंवा आपल्या विधिज्ञांमार्फत २८ सप्टेंबरपर्यंत लिखित स्वरूपात निवेदन तहसीलदार दापोली यांच्या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले आहे.

ही प्राप्त झालेली निवेदने ३० सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या महसूल लोकअदालतीमध्ये निकाली काढण्याच्या कार्यवाहीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या दावा प्रकरणांच्या तडजोडीबाबत तपशीलवार निवेदन सादर करून या महसूल अदालतीमध्ये सर्व संबंधित पक्षकारांनी स्वतः हजर राहुन ७०ब कुळाचे दावा प्रकरणांचा जास्तीत जास्त निपटारा होईल यासाठी सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!