मुख्य बातमी

मतदानादिवशी रत्नागिरी, लांजा येथील आठवडी बाजार बंद 

रत्नागिरी : मंगळवारी (२ डिसेंबर) मतदान दिवशी रत्नागिरी नगरपालिका व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (ग) मधील क तरतुदीनुसार रत्नागिरी नगरपालिका हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार १ डिसेंबर रोजी भरविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.

नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी रत्नागिरी नगरपालिका व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीपणे पार पाडावे. यासाठी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ (ग) मधील क तरतूदीनुसार रत्नागिरी नगरपालिका हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५ नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार १ डिसेंबर रोजी भरविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!