मुख्य बातमीराजकारण
युवासेनेच्या विभागप्रमुखपदी महिनाभरापूर्वीच रोहित पिंपळे यांची नियुक्ती

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना विभागप्रमुखपदी एक महिन्यापूर्वीच रोहित पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा खुलासा युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी केला आहे.
मिरजोळेमध्ये (खेडशी जि. प. गट ) आज शिंदे गटात पक्ष प्रवेश झाला. यामध्ये विकास सनगरे यांचा उल्लेख युवासेना विभाग प्रमुख म्हणून करण्यात आला आहे; ही दिशाभूल असून, विकास सनगरे यांच्या जागी युवासेनेच्या विभागप्रमुख पदी रोहित पिंपळे यांची नियुक्ती एक महिन्यापूर्वीच करण्यात आली आहे, असे
युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले.


