मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू

चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या १ मे ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावतील.

गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा मेमू विशेष दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण मेमू विशेष रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

या गाड्यांना अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या स्थानकांवर थांबा असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!