मुख्य बातमी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गोडावूनला भीषण आग

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे परिसरात आज (३० नोव्हेंबर) सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गोडावूनला भीषण आग लागली. या आगीत पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे लाखोंचे एचडीपी पाईप्स जळून भस्मसात झाले आहे. यात प्राधिकरणाचे मोठे नुकसान झाले आहे.

शहराजवळील नाचणे येथील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणच्या गोडाउन परिसरात ही दुर्घटना घडली. गोडावूनच्या बाजूला असलेल्या जागेतील सुकलेल्या गवताला अचानकपणे आग लागली. ही आग वाऱ्यामुळे पसरली आणि क्षणार्धात संपूर्ण गोडावून आगीच्या विळख्यात सापडले. गोडाऊनच्या आवारात पाणी पुरवठा योजनांसाठी ठेवलेले मोठमोठे ज्वलनशील एचडीपी पाईप्स (High-Density Polyethylene Pipes) आगीमुळे जळून खाक झाले.

दरम्यान, आगीमुळे गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली. नागरिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. रत्नागिरी नगरपालिका आणि एमआयडीसीचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली होती.

जीवन प्राधिकरणच्या या गोडावूनला आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे प्राधिकरणाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!