मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भरणे, साखरोली, वाकवली रस्त्याच्या रुंदीकरणामधील अतिक्रमणे हटवण्यासाठी खेड शहर भाजपा आक्रमक

खेड : तालुक्यातील भरणे, साखरोली, वाकवली रस्त्याच्या रुंदीकरणामधील अतिक्रमणे हटवण्यासाठी खेड शहर भारतीय जनता पार्टी (भाजपा) आक्रमक झाली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच सर्व अतिक्रमण हटवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ (नंदू) साळवी यांनी दिला आहे. अशा प्रकारचे निवेदन खेड नगरपालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

भरणे, साखरोली, वाकवली रस्ता क्र.रा.मा.१६२ किमी रस्त्याचे रुंदी करण्याचे काम चालू आहे. हा रस्ता मंजूर असून १३८.०६ कोटी आणि निवादा रक्कम १०३ कोटी आहे. या रस्त्याचे काम बोगस असून निकृष्ट दर्जाचे आहे. नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे न हटवता त्याच रुंदीचा रस्ता सुरू आहे. या सर्व प्रकारामध्ये मुख्याधिकारी तसेच बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार आहेत. खेड नगरपालिका हद्दीतील काही ठराविक लोकांना फायदा व्हावा यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) प्रमाणे रस्ता रुंद न करता रस्त्याची रुंदी कमी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सकाळच्या सत्रात २ते ३ तास वाहतूक कोंडीचा त्रास शहरातील नागरिकांना होत असतो. सबब आता रुंदीकरण न झाल्यास पुढील पन्नास वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण होणार नाही. या रस्त्याचे रुंदीकरण होऊ नये म्हणून राजकीय दबाव आहे.

संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन सर्व अतिक्रमण हटवून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ (नंदू) साळवी यांनी दिला आहे. अशा प्रकारचे निवेदन खेड नगरपालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा नगरसेवक तथा गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष प्रणव महापुस्कर, राहुल पाटणे, शैलेश धारिया, स्वराज गांधी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!