जुवे गावात श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : शहरानजीकच्या जुवे गावात श्री देव म्हसोबा (महेश्वर) श्री दत्त मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिरात उत्सवाचे आयोजन केले असून, २ डिसेंबरपासून या उत्सवाची सुरुवात झाली आहे. ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती दिनी सकाळी ९ ते सायं ४.३० दरम्यान श्रीदत्तनाम, सायं ४.३० ते ६ दरम्यान श्रीदत्तजन्मावर आधारित कीर्तन व श्रीदत्तगुरूंचा जन्मसोहळा पार पडणार आहे.
यानंतर ६.३० ते ८ दरम्यान श्रीदत्तगुरु पालखीदिंडी आणि रात्री ९.३० वाजता कराओके मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल. तसेच गुरुवारी दुपारी १ ते ३ पर्यंत खिचडी प्रसाद असणार आहे.
शुक्रवारी (५ डिसेंबर) रोजी दुपारी ११ वाजता शालांत माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदविका परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी १ ते ३ दरम्यान महाप्रसाद आहे.
या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



