मुख्य बातमी

देशभक्तीपर समूहगायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रथम

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभाग, राष्ट्रीय सेवा समिती आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय संविधान दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय सेवा समितीचे गजानन करमरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा माधवराव मुळ्ये सभागृहात पार पडली. यामध्ये एकूण ९ संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पोदार स्कूलने प्रथम, दामले विद्यालयाने द्वितीय तर मानेज् इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. बाबुराव जोशी गुरूकुल आणि फाटक हायस्कूल या दोन संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण राम तांबे, मंगेश मोरे आणि स्वरदा जोशी यांनी केले. संस्कार भारतीचे अध्यक्ष हेरंब जोगळेकर, सचिव आनंद पाटणकर यांच्यासह श्वेता जोगळेकर, अलका बेंदरकर, यशोदीप कयाळ तसेच सेवा समितीचे अनिरूद्ध लिमये यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय सेवा समितीच्या ऋची महाजन यांनी संविधान दिनाबद्दल मार्गदर्शन केले. सहभागी संघांच्या व्यवस्थापकांनीही स्पर्धा आणि संविधानाबद्दल मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!