मुख्य बातमी

अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेचे यश

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेतील विद्यार्थी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आले असून यात सिद्धी विनोद राणे (इ. दुसरी) हिचा जिल्ह्यात पाचवा, तर कुणाल आशिष शिंदे (इ. तिसरी) हा केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा आला आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा केळकर, उपशिक्षक राजेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिया राणे, उपाध्यक्षा श्वेता सनगरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तेजेष शिवलकर, उपाध्यक्ष प्रसाद राणे, सामाजिक कार्यकर्ते सुहास शीतप, समीर आठवले, प्रवीण सांडीम, गावातील ज्येष्ठ नागरिक रमाकांत वारेकर आदींनी अभिनंदन केले आहे.

शाळेची गुणवत्ता आणि लौकिक अधिक वाढवण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक प्रयत्नशील आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!