मुख्य बातमी
रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती
फक्त नगराध्यक्ष पदासाठी होणार मतदान

रत्नागिरी : नगरपालिकेच्या उद्या होत असलेल्या (२ नोव्हेंबर) नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये स्थगिती देण्यात आली आहे. या प्रभागात नगरसेवक पदाच्या दोन्ही जागांसाठी आता २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ज्या ठिकाणी न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते, त्या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती आली आहे.
आता या प्रभागात फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आता प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे.



