मुख्य बातमी

रत्नागिरी शहर प्रभाग क्र. १४ च्या शक्तीकेंद्र प्रमुखपदी अभिषेक रमेश सुर्वे यांची नियुक्ती

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिणच्या शहर मंडल वतीने संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक १४ च्या शक्तीकेंद्र प्रमुखपदी अभिषेक रमेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सन २०२६ ते पुढील नियुक्ती होईपर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणांच्या अधीन राहून पक्ष वाढीसाठी यथाशक्ती प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत. यावेळी शहर सरचिटणीस निलेश आखाडे, सचिव महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर, विजय माळवदे, आशू मोरे, प्रज्ञा टाकळे, शमी हर्चेकर, विजय सुर्वे, रमेश सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकली आहे, ती मी अतिशय विश्वासपूर्वक पार पाडीन,” अशी प्रतिक्रिया नवनियुक्त शक्तीकेंद्र प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी दिली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!