रत्नागिरी नगरपालिका प्रभाग १० मधील दोन नगरसेवक पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान

रत्नागिरी : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र. १० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्य पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर असणार आहे.
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ यातील नियम ४ आणि ५ व इतर सर्व अनुषंगिक तरतुदीप्रमाणे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी अनुसूचीच्या अनुक्रमांक १ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मतदार प्रभागातून रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
प्रभाग क्रमांक १० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तर अपर तहसीलदार, शेतजमीन व न्यायाधिकरण (रत्नागिरी) आणि निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय (रत्नागिरी) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशन मागे घेण्याचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, रत्नागिरी नगरपालिका कार्यालय असणार आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ११ डिसेंबर आहे. आवश्यक असल्याचा मतदानाचा दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता पासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून असणार आहे. मतमोजणीचे ठिकाण संत गाडगेबाबा सभागृह, रत्नागिरी नगरपालिका (रत्नागिरी) असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा २३ डिसेंबर पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार असेल.



