मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात 

आबलोली (संदेश कदम) : कॉलेजमधील केलेली मस्ती, एकत्र केलेला अभ्यास, एकत्र केलेला प्रवास, त्यातल्या गमती जमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, मित्रांमुळे खाल्लेला मार अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि निमित्त होतं श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज गुहागर या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे.

१९८९ ते १९९० साली अकरावी – बारावी कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर जवळपास ३६ वर्षांनी पुन्हा एकत्र येत १० मे रोजी नेचर रिसॉर्ट रामपूर येथे हे स्नेहसंमेलन पार पडले. दोन महिने उन्हाचा कडाका आणि अकस्मात होत असलेला पाऊस आणि येणाऱ्यांची कमी संख्या यामुळे स्नेहसंमेलनासाठी किती जण येतील होईल याची भीती होती. परंतु जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटण्याच्या आतुरतेने सर्वजण मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून भर उन्हात उपस्थित राहिले.

सकाळी ९ वाजता नेचर रिसॉर्ट येथे सर्वजण जमण्यास सुरुवात झाली. सकाळच्या अल्पोपहार नंतर सर्व मित्र मैत्रिणीना एकमेकांना गुलाबाचे आणि बागेतील फुल देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना राजेश विंचू यांनी केली आणि आपल्या ग्रुपचे नामकरण मैत्री कट्टा असे सुचविले. आपल्या वर्गातील सध्या हयात नसलेल्या मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सूत्रसंचालन राजेश कोळवणकर यांनी केले. स्नेहसंमेलन यशस्वीपणे आयोजित केलेले राजेश विंचू यांचा नेचर रिसॉर्टचे सर्वेसर्वा डॉ. मनोज रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच मैत्रीवरील मन भारावून टाकणार गाणं सादर केले. त्यानंतर सर्वांनी आपण सध्या करत असलेले कार्यक्षेत्र, जीवनामध्ये प्राप्त केलेले यश आदींची माहिती देऊन आपला परिचय दिला. यशस्वी उद्योजक सचिन बाईत यांनी मार्गदर्शनपर सल्ले दिले. हौशी विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्य सादर करून आपल्यातील कलागुणांची सादरीकरण केले. जेवणानंतर पुन्हा एक ओपन फोरम चर्चा करून नवीन मित्र मैत्रिणींच्या सुप्त गुणांना वाव देवून डान्स मस्ती करून, भविष्य सांगून सांगता करण्यात आली.

यावेळी अजित अहिरराव, सचिन बाईत, विनायक झगडे, राजेश कोळवणकर, राजेश विंचू, पिरोज आरेकर, संतोष बारगोडे, वैभव गुहागरकर, मिलिंद गुरव, संतोष शिंदे, उत्तम कोलगे, राजेश भोसले, अनिल घाणेकर, अनिता आरेकर – बोरकर, विष्णू सांगळे, राजेश व्ही. भोसले, निशा ओक, साधना गोयथळे, गीता नागेश उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!