केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

दिल्ली : गेले ३० दिवस जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा आज (२५ जुलै) अखेर राजीनामा दिला.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जंतर मंतर मैदानावर ठिय्या धरला होता. गेले ३० दिवस सलग सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही होती. गेले २५ दिवस शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्च्यादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या विद्यार्थांना केलेल्या लाठीमारामुळे हिंसक वळण लागले आणि तिथूनच या संपूर्ण देशभरातून या विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळाला. अनेक सिनेकलाकर, राजकारणातील नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
आज अखेर विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले असून, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.



