मुख्य बातमी

कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ, मुंबई संचलित श्री. वि .प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये आज महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कार्यवाह संजय कोलगे, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, ग्रामस्थ नंदकुमार कोलगे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मयेकर, विभाग प्रमुख श्रीमती मोहिते, श्री. खुळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थिती उपस्थितीत उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. यामध्ये धारिष्ट मोहन लिंगायत, श्रावणी दत्ताराम पाष्टे, प्रतीक प्रकाश गोताड, नेहा रामधनी लोधी यांचा समावेश होता.

शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. खुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त करताना डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी उपेक्षितांच्या जीवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान फार मोठे असल्याचे नमूद करताना डॉ. आंबेडकर जगप्रसिद्ध झाले, त्यामागे त्यांची ज्ञानपीपासूवृत्ती होती की जी जगाला मार्गदर्शक आहे, असे उद्गार काढले. विभाग प्रमुख श्रीमती मोहिते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!