मुख्य बातमी

दिव्यांग सप्ताहाचा उद्या समारोप

रत्नागिरी : शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागातंर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत दिव्यांग सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा सांगता कार्यक्रम ९ डिसेंबर रोजी मराठा मंदिर सभागृह येथे सकाळी १० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांनी दिली.

या कार्यक्रमात डॉ. स्वाती पाटील (आरबीएसके) या “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ चा कायदा, दिव्यांगत्व जन्माला येवू नये” याबाबत, तर जिल्हा परिषद आयटी सेलचे अभिजित भट “चॅट बॉट” या विषयावर मार्गदर्शन करतील. दीपक आंबवले (प्र. वैसाका) शासकीय योजनांबाबत, वित्तीय महामंडळाच्या जिल्हा समन्वयक रोशनी सावंत, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र योजनांबाबत स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर विशेष प्रावीण्य प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल.

कार्यक्रमात कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यामंदिर, सविता कामत विद्यामंदिर, शामराव भिडे कार्यशाळा या शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. जास्तीत जास्त दिव्यांगानी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती शिरभाते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!