रा. भा. शिर्के प्रशालेत जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन साजरा

रत्नागिरी : शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. पडवेकर यांनी वाढत्या लोकसंख्येची माहिती देताना लोकसंख्या वाढीची कारणे, समस्या व त्यावरील उपाययोजना सांगितल्या. वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो हेही त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. खेड्यांचा विकास झाल्यास शहरावरील लोकसंख्येचा ताण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के. डी. कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चीन, फिनलँड या देशांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे गांभीर्य विशद केले. स्वराज्य स्वभा व सांस्कृतिक विभागाच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला. स्वराज्य सभाप्रमुख सौ. दुदगीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



