सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे किल्ले पालगड (घेरा पालगड) येथे गडदूर्ग स्वच्छता मोहीम

दापोली : तालुक्यातील किल्ले पालगड (घेरा पालगड) येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये खेड आणि दापोली येथील युवकांनी सहभाग घेतला होता.
पालगड येथील धर्मप्रेमी विकास वेदक यांनी सर्वांना सकाळचा अल्पोपहार दिला. या उपक्रमासाठी मुंबईमधून सर्वेश सुधाकर आरेकर सहभागी झाले होते. तसेच खेड येथील गडप्रेमी नितीन विठोबा दिवटे (वय ७० वर्षे) यांचा सहभाग तरुणांना प्रेरणादायी होता.

या मोहिमेमध्ये गव्हे तालुका दापोलीचे सरपंच लक्ष्मण गुरव यांनी विशेष सहभाग होता. तसेच वनौशी, करजगाव, लाडघर, खेड, भिलारे- आयनी, दापोली अशा विविध गावांतून ३९ गडप्रेमी दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.
प्रारंभी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दुर्ग पूजनामध्ये भगवा ध्वज उभारून त्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गडाची स्वच्छता करण्यात आली. दुपारच्या महाप्रसादानंतर गडप्रेमींना धर्म शिक्षणाचे महत्त्व आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक नामजप करण्यात आला आणि शेवटी स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांचा सराव घेण्यात आला.



