मुख्य बातमी

न. प. स्वच्छता अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेत वेदा विजय पाडावे अव्वल

कुंचल्यातून साकारले स्वच्छ रत्नागिरीचे स्वप्न

रत्नागिरी : नगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेत वेदा विजय पाडावे, (रा. भा. शिर्के प्रशाला) हिने इयत्ता ८ वी ते १० वी या गटात प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या यशाने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, उद्या २४ मार्च रोजी तिचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

नगरपालिकेने शहर स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. यामध्ये चित्रकला स्पर्धेच्या मोठ्या गटात वेदाने आपल्या कलेच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. तिने रेखाटलेल्या चित्रातून स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरीचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.

वेदा विजय पाडावे आणि इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज (२४ मार्च) सकाळी ११ वाजता रत्नागिरी नगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात ‘स्वच्छता चॅम्पियन’, ‘पर्यावरण दूत’ आणि ‘स्वच्छता ब्रँड अँबेसिडर’ यांचाही भव्य सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

वेदाच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि नगरपालिका प्रशासनाने तिचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!