मुख्य बातमी

रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षण सोडत २२ रोजी सावरकर नाट्यगृहात

रत्नागिरी : तालुक्यामधील ९४ ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची असून, या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत कार्यक्रम २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात घेण्यात येणार आहे. इच्छुक ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.

मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २- अ(४) (६) नुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडील अधिसूचना आदेश क्र. /जिकार /कार्या-३ / ग्रापनि/ सरपंच आरक्षण / २०२५ दिनांक ११ एप्रिल २०२५ अन्वये रत्नागिरी तालुक्यामधील ९४ ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची आहेत.

या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाटयगृह, मारुती मंदिर येथे घेण्यात येणार आहे. इच्छुस्थांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी व वेळी उपस्थित रहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!