कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, महाराष्ट्र राज्य शिवशाही युद्ध कला वस्ताद सुधीर कांबळे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी वस्ताद सुधीर कांबळे यांचा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे २६ व २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुंबईतील समाजसेवक यदुनाथ बेर्डे, कोकणवाडीचे शशिकांत पटवर्धन उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर, सचिव संजय कोलगे, सहसचिव राजेंद्र फणसोपकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे आणि संस्थेतील सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य हेही उपस्थित राहणार आहेत.



