मुख्य बातमी

“पेंट युअर पॅशन” चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मारुती मंदिर येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने बाया कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त “पेंट युअर पॅशन” ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पटवर्धन हायस्कूलच्या कीर सभागृहामध्ये १३ डिसेंबरला उत्साहात आणि रंगतदार वातावरणात झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ८ शाळांमधून एकूण १५५ विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी भविष्यातील रत्नागिरी, पर्यावरणपूरक घर, माझ्या घरातील आवडता कोपरा, असे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वरील विषयांवर चित्रे काढून आपली सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.

सहभागी शाळांमधून कला शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वप्नजा मोहिते व आर्किटेक्ट मकरंद केसरकर यांनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रत्येकी सहभागी शाळांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचेही कौतुक केले.

डॉ .स्वप्नजा मोहिते यांनी कला आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी आपले विचार मांडले. श्री. केसरकर यांनी कला आणि कलेमधून करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी माहिती सांगितली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांमधील कल्पकता, रंगसंगती आणि संदेशवहनाचे कौतुक केले.

विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि विशेष पारितोषिके देण्यात आली. तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद शेवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्किटेक्ट कविता सावंत यांनी केली. आभारप्रदर्शन सिद्धी करंदीकर यांनी केले. आयोजकांनी पुढील वर्षी स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!