आरोग्यमुख्य बातमी

मराठा मंडळातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : येथील मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे रत्नागिरी शहरात प्रथमच साधना फाऊंडेशन (मुंबई) आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत मराठा भवन येथे होणार असून, यासाठी मुंबईतील नामांकित वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अत्याधुनिक उपकरणांसह ही टीम रुग्णांच्या तपासण्या करणार आहे. आजपर्यंत कोणत्याही आरोग्य शिबिरात न झालेल्या चिकित्सा व मार्गदर्शन या ठिकाणी पूर्णपणे मोफत केले जाणार आहे. यामध्ये स्त्रीरोग चिकित्सा, नेत्र चिकित्सा, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, अत्याधुनिक मशीन द्वारे हाडांची संभाव्य विकार तपासणी, जनरल फिजिशिअन, ईसिजी यांचा समावेश आहे.

यासाठी नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. याकरिता ८०१०३०८८४६ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नोंदणी करावी. रुग्णांनी येताना स्वतःचे जूने रिपोर्ट घेऊन यावे.

जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा मंडळ, रत्नागिरी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!