मुख्य बातमी

ओणी येथे टेम्पो-दुचाकीची धडक; स्वार जखमी

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी पेट्रोलपंपासमोर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हरेश भितळे (३६, मंदरूळ, गणेशवाडी) जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडला.

या प्रकरणी वैभव शांताराम मासये यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. हरेश भितळे हे ओणी येथून मुंबई-गोवा महामार्गाने तिवंदामाळ येथे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच ०८ बीजे १७७५) ही घेवून जात होते. त्याचवेळी समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवरील (एमएच ०४ बीयु ३२४२) चालकाने ओणी पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या विशिष्ट परस्थितीकडे लक्ष न देता बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून हरेश भितळे यांच्या ताब्यातील वाहनाला धडक दिली.

या अपघातामध्ये हरेश भितळे जखमी झाले असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी टेम्पो मालक हुसेन अब्दुल पाटणकर (वाकेड, खालीवाडी, लांजा) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९१, १२५ व मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!