तळवली हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, या प्रशालेत गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका अध्यक्ष मंगेश गोरिवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार, श्री. घाग, श्री. मोहिते, श्री. शिर्के, सौ. वाघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी बारावी अशा तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार व इतर सहाय्यक शिक्षक यांनी केले होते. गुहागर तालुक्यातील स्पर्धकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
या कथाकथन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक गुहागर हायस्कूलची विद्यार्थिनी कु.दुर्वा दशरथ नाटेकर, द्वितीय क्रमांक बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेलचा विद्यार्थी श्रीपर्ण मंगेश गोरीवले, तर तृतीय क्रमांक इंग्लिश मेडियम स्कूल पाटपन्हाळेची विद्यार्थिनी लावण्या अंकुश चव्हाण हिने पटकावला. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक कोळवली हायस्कूलची सई समीर रानडे, द्वितीय क्रमांक पाचेरी आगर वझे हायस्कूलची विद्यार्थिनी गौरी दीपक झोरे, तर तृतीय क्रमांक तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी तनुश्री नोमेश कारेकर हिने पटकावला. अकरावी- बारावी गटात प्रथम क्रमांक पाटपन्हाळे हायस्कूलची विद्यार्थिनी सदिच्छा संदीप कदम, द्वितीय क्रमांक तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी संदीप कळंबटे, तर तृतीय क्रमांक अंजनवेल हायस्कूलची ज्ञानेश्वरी कीरण शेळके हिने पटकावला.

तीनही गटात प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव श्री. साठे यांनी तीनही गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्री. देवरुखकर यांनी केले. प्रास्ताविक श्री. साळुंके यांनी केले. श्री. कुळे यांनी केलेले सुंदर फलक लेखन स्पर्धेचे आकर्षण केले होते. श्री. केळस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.


