नाचणे आणि मिरजोळे जि.प गट आयोजित मंगळागौर आणि खेळ पैठणीचा स्पर्धा
मध्य मंडल भाजपा रत्नागिरी (द) आणि महिला मोर्चा मध्य मंडल यांच्यातर्फे आयोजन

रत्नागिरी : महिलांच्या पारंपरिक उत्सवाला नवा आयाम देत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच मत्स्य आणि बंदरविकास मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणमधील मध्य मंडल आणि महिला मोर्चा मध्य मंडल आयोजित नाचणे आणि मिरजोळे जि.प गटामधील महिलांसाठी मंगळागौर आणि खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (२४ ऑगस्ट) टीआरपी येथील अंबर हाॅल येथे सकाळी ११ ते ५ या वेळेमध्ये होणार आहे.
या मंगळागौर स्पर्धेमधे प्रथम क्रमांक विजेत्या संघास ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी ७ हजार आणि सन्मानचिन्ह, तर तिसऱ्या क्रमांकासाठी ५ हजार आणि सन्मानचिन्ह दिले जाणार असून, दोन संघाला ऊत्तेजनार्थ २५०० रुपये आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. खेळ पैठणीचा यासाठी प्रथम क्रमांकाला ५ हजारची पैठणी , दुसऱ्या क्रमांकाला २५०० ची सेमी पैठणी दिली जाणार आहे. उपस्थित पहिल्या ३०० महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, प्रदेश महिला मोर्चा सचिव सौ. शिल्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियल जोशी आणि सर्व महिला पदाधिकारी तसेच दोन्ही जि. प. गटामधील कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी सौ. दीप्ती फडके (९४०४७६३७६२), अनुश्री आपटे (८५३०९५७५५५), सौ. नेत्रा करंदीकर (९८३४६४०९१७) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



