कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

रायगड जिल्हा परिषद शाळेत रुद्र सेवा फाऊंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप

रायगड : रुद्र सेवा फाऊंडेशनतर्फे कर्जत (जि. रायगड) येथील जिल्हा परिषद शाळा चोची येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा चोची आणि कोंढाणे या दोन्ही शाळांचे विद्यार्थी, चोची शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर वाडीले, कोंढाणे शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मारुती थोरवे, चोची शाळेचे शशिकांत पालकर, कोंढाणे शाळेच्या आरती बारवाल यांच्यासह इतर अंगणवाडी शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पालकर यांनी केले. यावेळी रुद्र सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धेश्वर मालवणकर, उपाध्यक्ष निवृत्ती परब, सेक्रेटरी राजेंद्र वाळके, खजिनदार ललित खराडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. मालवणकर यांनी फाऊंडेशनची ओळख करून दिली. त्यानंतर फाऊंडेशनचे सेक्रेटरी श्री. वाळके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपाध्यक्ष श्री. परब आणि सभासद श्री. पालांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

त्यानंतर फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर, रंगीत खडू, पाण्याची बाटली यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पोहे आणि शिऱ्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी रुद्र सेवा फाऊंडेशनचे इतर सभासद दीपक देसाई, रमेश येरूणकर, गौरव गुरव, सिद्धेश वारंग, दिनेश पालांडे, रुद्र परब, नेहा मालवणकर, रिद्धी मालवणकर उपस्थित होते. सरतेशेवटी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यांच्या वतीने फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे आणि शिक्षणाचे महत्त्व काय याबाबत रुद्र सेवा फाऊंडेशनतर्फे जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!