मासू येथे रस्त्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतर्गत गुहागर तालुक्यातील मासू बुद्रुक येथील घाणातले टेप ते भाटलवाडी या रस्त्याचे उद्घाटन काल (१० मे) रोजी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या, त्या शेतकऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. उपसभापती निलेश सुर्वे यांनी श्री गणेश नृत्य कलापथक भाटलवाडी यांना संबोधित करताना आता झालेल्या नवीन रस्त्याला लवकरात लवकर डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. वाडीचे प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम यांनी रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे विशेष कौतुक केले व मासू गावासाठी यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कामे होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
उद्घाटन सोहळ्यासाठी पंचायत समिती सदस्या स्नेहा शिगवण, भाजपा सरचिटणीस सचिन ओक, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विजय मसुरकर, शेखर आलीम, महादेव आलीम, उपसरपंच उज्ज्वला नाचरे, सदस्या श्रीमती शर्मिला आलीम, श्री गणेश नृत्य कला पथक भाटल वाडी अध्यक्ष गंगाराम आलीम, मुंबई अध्यक्ष महेश आलीम, वाडी प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम, शैलेश आलीम, अंकुश बारस्कर, प्रमोद आलीम आदी महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


