नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपालिका क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणुकीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. २२९/ जपकु (२९) परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८ जेयुडीएल-तीन दि. ८ मे १९६८ अन्वये शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन उपसचिव हेमंत महाजन यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम बँका आदींनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी लागू राहील.



